Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वातावरण तापलेले असताना नेत्यांच्या परस्पर आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर शंका उपस्थित केली आहे. नागपूरमध्ये 'संविधान संमेलन' कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राहुल गांधी येणार आहेत. मात्र त्यापूर्वी राहुल गांधींच्या हातातील 'लाल संविधान' चर्चेचा विषय ठरले आहे. यावरुन देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले.