धारणी : ‘‘जंगलात रोजगाराची कोणतीही साधने उपलब्ध नसल्यामुळे त्याचा गंभीर परिणाम महिलांना भोगावा लागत आहे. त्यामुळे आता महायुतीचे सरकार पुन्हा राज्यात आले तर या महिलांना लखपती दीदी बनविणार’’ असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.