उल्हासनगरः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाल रंगाचे संविधान हाती घेतल्यास नक्षलवादी ठरविले आहे. मी मात्र देशासाठी लाल रंगाचे संविधान हाती घेतले असून फडणवीस यांनी मला अटक करावी, असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी उल्हासनगरात केले. उल्हासनगर विधानसभेचे महायुतीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे उमेदवार ओमी कलानी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या महिला स्वाभिमान प्रचार सभेत त्या बोलत होत्या.