Maharashtra assembly election 2024: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे यांच्या घोषणेचे समर्थन केले आहे. फडणवीस म्हणाले की ही घोषणा देणे याच चुकीचे काही नाही. देशाचा इतिहास पाहिला तर हा देश जेव्हा जाती, धर्म आणि प्रांतात विभागला गेला तेव्हा तेव्हा गुलाम झालेला आहे. देशही विभागला आणि लोकही. जर कोणी विभाजित होऊ नका, फूट पाडू देऊ नका म्हणत असेल तर याच आक्षेप घेण्यासारखे काय आहे, असा सवालही फडणवीस यांनी केला.