बीड : कृषी मंंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री आणि परळी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्यावर चार गुन्ह्यांची नाेंद आहे. विशेष म्हणजे यातील एक गुन्हा आचारसंहिता भंगाचा तर तीन गुन्हे फसवणूकीचे आहेत. पक्षानेच याबाबत जाहीर प्रगटन दिले आहे. देवस्थानची जमिन शासकीय अधिकाऱ्यांसोबत संगनमत करुन जमिनीचे खोटे खरेदीखत केल्याच्या गुन्ह्याचाही यात समावेश आहे.