छत्रपती संभाजीनगर: परळी विधानसभा निवडणूक निर्भय वातावरणात पार पाडण्याचे निवडणूक आयोगाचे शपथपत्र खंडपीठात सादर करण्यात आले. ते निवेदन स्वीकारून खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. संतोष चपळगावकर यांनी याचिका निकाली काढल्या.
परळी विधानसभा मतदारसंघातील २३३ पैकी परळीतील १२२ मतदान केंद्रे 'अति संवेदनशील' घोषित करावे, अशी मुख्य विनंती करणाऱ्या याचिका परळीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माधवराव जाधव आणि राजेभाऊ श्रीराम फड यांनी दाखल केली होती.
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आणि मतमोजणी दिवशी बीडमध्ये प्रचंड मोठा राडा झाला होता. त्यामुळे मतदारसंघाच्या अंतिम निकालालाही वेळ लागला होता.