बदनापूर : बदनापूर मतदारसंघात मागील दहा वर्षांत आमदार नारायण कुचे यांनी विकासाचे काम केले आहे. त्यामुळे कुचे यांना मतदान करून विजयी करावे, असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. नारायण कुचे यांच्या प्रचारार्थ ताडहदगाव (ता. अंबड) येथे आयोजित जाहीर सभेत दानवे बोलत होते.