धाराशिवः जिल्ह्यातील चारही मतदारसंघांमध्ये तिरंगी ते चौरंगी लढती असल्याचे चित्र स्पष्ट झाले. यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा अटीतटीची लढती होत आहेत. उस्मानाबाद, उमरगा मतदारसंघांमध्ये दोन्ही शिवसेनेमध्येच अटीतटीची लढत आहे..महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेकांनी अपक्ष म्हणून दाखल केलेले उमेदवारी अर्ज अखेरच्या दिवशी सोमवारी मागे घेतल्याने चारही मतदारसंघांतील बंडखोरी टाळण्यात महाविकास आघाडी व महायुतीला यश आले आहे. जिल्ह्यातील चारही मतदारसंघांमध्ये एकूण ६६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये सर्वाधिक २३ उमेदवार तुळजापूर मतदारसंघात आहेत. उस्मानाबाद १२, उमरगा १०, तर परंडा मतदारसंघात २१ उमेदवार आहेत..उस्मानाबाद मतदारसंघउस्मानाबाद मतदारसंघातून ४३ पैकी ३१ जणांनी अर्ज मागे घेतल्याने आता १२ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. यामध्ये दोन्ही शिवसेना उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत होत आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार कैलास घाडगे पाटील, महायुतीकडून शिवसेनेचे अजित पिंगळे, वंचित आघाडीचे ॲड. प्रणित डिकले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे देवदत्त मोरे यांच्यासह १२ उमेदवार रिंगणात आहेत..उमरगा मतदारसंघउमरगा मतदारसंघातून २८ पैकी १८ जणांनी अर्ज मागे घेतल्याने १० उमेदवार रिंगणात असून, शिवसेनेचे उमेदवार विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार प्रवीण स्वामी यांच्यातच प्रमुख लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीकडून रमाकांत गायकवाड रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे, त्यांचे पुत्र दिग्विजय शिंदे यांनी अर्ज मागे घेतले..परंडा मतदारसंघपरंडा मतदारसंघातून ४२ पैकी २१ जणांनी अर्ज मागे घेतल्याने आता २१ जण निवडणूक रिंगणात आहेत. याठिकाणी चौरंगी लढत असली तरी महायुतीतून शिवसेनेचे उमेदवार विद्यमान आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत व महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार राहुल मोटे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीकडून प्रवीण रणबागुल, राष्ट्रीय समाज पक्षाकडून डॉ. राहुल घुले रिंगणात आहेत. याठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रणजित पाटील यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे महाविकास आघाडीतील बंडखोरी टाळण्यात यश आले..Supreme Court : कोरोना लसीच्या साईड इफेक्ट्ससंबंधी याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले खडे बोल.तुळजापूर मतदारसंघतुळजापूर मतदारसंघातून ५१ पैकी २८ जणांनी अर्ज मागे घेतल्याने आता २३ उमेदवार रिंगणात असून, येथे चौरंगी लढत होत आहे. भाजपकडून विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील, काँग्रेसकडून ॲड. धीरज पाटील, वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. स्नेहा सोनकाटे, समाजवादी पार्टीकडून देवानंद रोचकरी यांच्यासह २३ उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जीवनराव गोरे, अशोक जगदाळे आदींनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महाविकास आघाडीला बंडखोरी रोखण्यात यश आले. १९९० पासून २०१९ च्या निवडणुकीपर्यंत काँग्रेसकडून माजी मंत्री चव्हाण यांना संधी देण्यात आली होती. यावेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी अर्ज मागे घेतला..ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.