Dharmajagran Yatra: अजितदादांमुळे शिंदे लागले कामाला, काढणार ‘मुख्यमंत्री धर्मजागरण यात्रा’

CM Eknath Shinde Shiv Sena Yatra: महायुतीत अजितदादा जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून, तर भाजप धार्मिक गोष्टींचं राजकारण करुन लोकांपर्यंत पोहचतंय.
Devendra Fadnavis, Eknath Shinde and Ajit Pawar
Devendra Fadnavis, Eknath Shinde and Ajit Pawarsakal
Updated on

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातच येत्या १५ दिवसात राज्यात आचारसंहिता लागू शकते, असे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोलापुरात जनसन्मान यात्रेदरम्यान दिलेत. त्यातच जागावाटपासंदर्भात घडामोडीही वेगानं सुरु आहेत.

महायुतीत अजितदादा जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून, तर भाजप धार्मिक गोष्टींचं राजकारण करुन लोकांपर्यंत पोहचतंय. म्हणजे भाजपचे नेते नितेश राणे मागील काही दिवसात धार्मिक वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. अशातच महायुतीत अजितदादांची जनसन्मान यात्रा तर, महाविकासआघीत शरद पवारांच्या पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सुरु आहे. यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचण्याचा काका-पुतण्याचा प्रयत्न सुरु आहे.

अशातच आता सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी शिंदे पितापुत्रांनीही कंबर कसलेली दिसतेय. शिंदे पितापुत्राकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ‘धर्मजागरण यात्रे’चं आयोजन करण्यात येणार आहे.

खरंतर महायुतीत अजितदादांची कोंडी होत असल्याची चर्चा आहे. कारण भाजप नेते अजितदादा सोबत आल्यानं नुकसान झाल्याचं वक्तव्य करतात तर, शिंदे गटातही अजितदादांच्या सोबत येण्यानं धुसफूस आहे. अजितदादांची कार्यपद्धती अन् शिंदेंची कार्यपद्धती यातही बराच फरक आहे. त्यामुळे अजितदादांना साईडलाईन केलं जात असलं तरी, त्यांच्या जनसन्मान यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहता अजितदादांच्या पक्षाला लोकांपर्यंत पोहचण्यास मदत होत आहे. शिवाय, जागावाटपाच्या वाटाघाटीत जरी अजितदादा मागे पडत असले तरी, लोकांपर्यंत पोहचण्यात तूर्तास तरी ते शिंदेंच्या तुलनेत पुढे आहेत, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

आता ही धर्मजागरण यात्रा नेमकी काय आणि कशी असणार आहे? ते पाहूयात-

  1. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मुख्यमंत्री 'धर्मजागरण यात्रा'काढली जाणार

  2. धर्मजागरण यात्रेच्या माध्यमातून खेडोपाड्यातील वाडी, वस्तीवर जाऊन शिवसेना अध्यात्मिक सेनेचे पदाधिकारी प्रचार करणार

  3. कोल्हापुरातल्या अंबाबाई देवस्थानात दर्शन घेऊन या यात्रेला सुरूवात केली जाणार असल्याची माहिती

  4. गावोगावी महाराष्ट्रातील वासुदेव, गोंधळी याद्वारे पारंपारिक लोककला महत्वाच्या ग्रामयात्रा तथा दिंडी, हिंदुत्ववादी संघटनांसमवेत पदयात्रा काढून तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असेल

Devendra Fadnavis, Eknath Shinde and Ajit Pawar
Maratha Reservation : इथं आंदोलन सुरू केलं म्हणून पलीकडं आंदोलन करणे महाराष्ट्राला शोभत नाही; संभाजीराजेंचे हाकेंच्या आंदोलनावर भाष्य

या यात्रेतून हिंदू धर्म, पारंपरिक संस्कृतीच्या, लोककलेच्या माध्यमातून मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न करणे म्हणजे एकप्रकारे भाजपचा धर्मावर आधारित अजेंडा हायजॅक करण्याचा शिंदे पितापुत्रांचा डाव असल्याचीही चर्चा आहे.

एकीकडे भाजप शिंदे आणि अजितदादांचा यूज अँड थ्रो वापर करत असल्याचा विरोधकांकडून वारंवार आरोप केला जातो. पण, इथे शिंदे त्याउलट मुख्यमंत्री धर्मजागरण यात्रा काढून भाजपला अडचणीत आणताहेत का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे

Devendra Fadnavis, Eknath Shinde and Ajit Pawar
Sharad Pawar: "त्यामध्ये काही चुकीचं नाही," नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवार नेमकं काय म्हणाले?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.