यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील दिग्रस विधानसभा निवडणुकीला यावेळी राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागले होते. २० वर्षांनंतर पहिल्यांदाच आजी-माजी मंत्र्यांमध्ये थेट सामना झाला. काँग्रेसकडून महाविकास आघाडीचे माजी मंत्री माणिकराव ठाकरे रिंगणात उतरले होते. तर महायुतीकडून विद्यमान पालकमंत्री आणि शिवसेनेचे संजय राठोड मैदानात होते. या हाय वोल्टेज लढतीत संजय राठोड यांनी 28775 मतांनी विजय मिळवला.