धाराशिव : धाराशिव बैठका, कोपरा सभा, काही ठिकाणी जाहीर सभा आणि मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटींवर सर्वच पक्षांचे उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी भर दिल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. जिल्ह्यातील चारपैकी दोन मतदारसंघांत दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांत थेट लढत होत आहे.