भंडारा : विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे. यावेळी भंडारा जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रात उमेदवारी दिल्यावरून राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. वरवर उमेदवार जाहीर झाले असले तरी खरा ट्विस्ट पुढे येणार असल्याचे दिसून येते.