Baramati Assembly Election 2024: बारामतीत घड्याळ की तुतारी? कोणते मुद्दे ठरणार वरचढ? कोण जिंकणार गड? वाचा सविस्तर...

Baramati Assembly Constituency 2024 Analysis : बारामती घड्याळ की तुतारी?, याची चर्चा आता होत आहे. अजित पवार की युग्रेंद्र पवार कोण येणार? असा सवाल सर्वांच्या मनात आहे.
ajit pawar sharad pawar baramati yugendra pawar pune political news blessing news
ajit pawar sharad pawar baramati yugendra pawar pune political news blessing newssakal
Updated on

Baramati Election Predictions: विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आता उत्सुकता आहे ती निकालाची. बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी प्रमुख लढत होत असून बारामतीकर कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतात, याचे औत्सुक्य आहे.

लोकसभा निवडणूकीत जेव्हा अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मैदानात उतरविले, त्याच वेळेस विधानसभेला ज्येष्ठ नेते शरद पवार हेही अजित पवार यांना सहजासहजी विधानसभेची निवडणूक जिंकू देणार नाही अशी चर्चा होती. त्या नुसारच शरद पवार यांनी थेट अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवारांनाच रिंगणात उतरविले. त्यांच्या पाठीशी ताकद उभी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.