Phulambri Assembly Elections 2024: शेतकऱ्यांना मुख्यमंत्री 'बळीराजा योजने'तून मोफत वीज..

Phulambri Vidhan Sabha elections 2024: फुलंब्री तालुक्यातील १९ हजर १८४ शेतकऱ्यांना घरपोच महावितरण कार्यालयातर्फे भरलेल्या वीज बिलाची पावती वितरित करण्यात येणार आहे.
Phulambri Assembly Elections 2024
Phulambri Assembly Elections 2024sakal
Updated on

फुलंब्री: महावितरण कार्यालयात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे भरलेल्या वीज बिलाच्या पावत्याचे प्राथमिक स्वरूपात भाजपचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ यांच्या हस्ते शुक्रवारी वितरण करण्यात आले.

फुलंब्री तालुक्यातील १९ हजर १८४ शेतकऱ्यांना घरपोच महावितरण कार्यालयातर्फे भरलेल्या वीज बिलाची पावती वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी पंपाचे चालू वर्षाचे बिल आकारण्यात येणार नाही. शेतकरी हिताच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले.

Phulambri Assembly Elections 2024
Aaple Sarkar Portal : आपले सरकार पोर्टलचे सर्व्हर डाउन, विद्यार्थ्यांना मिळेनात प्रमाणपत्र

याप्रसंगी फुलंब्री सोसायटीचे चेअरमन श्यामराव मालोदे, तालुका उपाध्यक्ष राम बनसोड, सुमित प्रधान, सुनील शेवाळे, भास्कर कोलते, गोपीनाथ मालोदे, पंजाबराव कोलते, कार्यकारी अभियंता व्ही. एस.ओवळ, सहायक अभियंता गणेश साखळे, एम.बी. पवार, एस. एस. आहिरे, ए. ए. सय्यद, आर. जी. जाधव, एस. के. पात्रे व शेतकरी बांधव उपस्थित होते.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.