नागपूर : पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात यावेळी पंजा चिन्ह नसल्याने अनेक मतदार मतदान केंद्रातून परत आले. यावेळी केंद्रावरील काही वृद्ध मतदारांनी ‘ईव्हीएममध्ये पंजा नही दिख रहा’ असे म्हणत परतीचा रस्ता धरला. त्यामुळे याचा थेट फटका महाविकास आघाडीचे तुतारीवर उभे असलेले उमेदवार दुनेश्वर पेठे यांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.