गडचिरोली : बरेच दिवस उमेदवारीसाठी ताटकळवल्यानंतर महायुती, महाविकास आघाडीतील अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आले. पण त्यामुळे उमेदवारीच्या आशेत असलेल्या इच्छुकांचा अपेक्षा भंग झाला असून त्यांना बंडाचा झेंडा उंचावला आहे. बंडोबांचे मन वळवण्याच्या कसरती प्रमुख राजकीय पक्षांना कराव्या लागत आहेत.