IPS Transfers: निवडणूक आयोगानं झापल्यानंतर आठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या! लवकरच जाहीर होणार निवडणूक?

राज्य पोलिस दलातील ‘आयपीएस’ आणि राज्य पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश सोमवारी गृहविभागाने काढला.
IPS officers
IPS officers
Updated on

मुंबई : राज्य पोलिस दलातील ‘आयपीएस’ आणि राज्य पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश सोमवारी गृहविभागाने काढला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे फेरबदल करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगानं अधिकाऱ्यांच्या बदल्या न केल्यावरुन राज्य सरकारला झापलं होतं. यापार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळं आता लवकरच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

IPS officers
Raj Thackeray: "राजकारण्यांना जाळ्या नसलेल्या इमारतीवरुन उड्या मारायला लावल्या पाहिजेत"; राज ठाकरेंचा घणाघात

मुंबईच्या उत्तर प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त राजीव जैन यांच्याकडे राज्य राखीव पोलिस दलाच्या उपमहानिरीक्षकपदाची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या जागी सशस्त्र पोलिस दलाचे अतिरिक्त आयुक्त अभिषेक त्रिमुखे यांची नियुक्ती केली. बंदर परिमंडळचे उपायुक्त संजय लाटकर यांच्याकडे सायबर महाराष्ट्र विभागात पोलिस अधीक्षकपद दिले आहे.

IPS officers
Nobel Prize 2024: फिजिओलॉजी अन् मेडिसिनसाठी नोबेल जाहीर; व्हिक्टर अँब्रॉस अन् गॅरी रुव्हकून यांच्या नावावर शिक्कामोर्तब

राज्य पोलिस सेवेतील पोलिस उपायुक्त प्रशांत कदम (परिमंडळ चार) यांची अनुसूचित जाती व जमाती आयोग, हेमराज राजपूत (परिमंडळ सहा) यांची सायबर महाराष्ट्र, ठाणे शहराचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांची एसीबी-ठाणे, वाशीमचे अपर पोलिस अधीक्षक भरत तांगाडे यांची ठाणे जिल्ह्यात तर राज्य गुप्तवार्ता विभागांचे (नागपूर) उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांची पुणे पोलिस आयुक्तालयात बदली झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.