Eknath Shinde And Ajit Pawar: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे शक्तीप्रदर्शन! अजित पवार बारामती तर एकनाथ शिंदे 'या' मतदारसंघातून भरणार अर्ज

Baramati Vidhan Sabha Elecction: दुसरीकडे मनसेकडून ठाकरे कुटुंबातील पहिल्यांदा निवडणूक लढवणारे अमित ठाकरे माहीममधून उमेदवारी दाखल करणार आहेत.
Eknath Shinde and Ajit Pawar
Eknath Shinde and Ajit PawarEsakal
Updated on

अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा 15 ऑक्टोबरला शंखनाद झाला आहे. राज्यात एकाच टप्प्यात येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

याशिवाय महाराष्ट्रातील नांदेड व केरळमधील वायनाड हे लोकसभा मतदारसंघ तसेच विविध राज्यांमधील ४८ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी याचवेळी मतदान होणार आहे. दोन्ही राज्ये व पोटनिवडणुकीची मतमोजणी येत्या २३ नोव्हेंबरला होईल.

दरम्यान महाराष्ट्रात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 29 ऑक्टोबर ही शेवटची तारीख असल्याने राज्यातील बडे नेते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.