नांदेड : ‘‘राज्यात लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या विरोधात न्यायालयात गेलेल्यांना या निवडणुकीत ‘बहिणी’ त्यांची जागा दाखवणार आहेत. तसेच कोणाचाही ‘माई का लाल’ आला तरी लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही, असा इशारा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेडच्या सभेत विरोधकांवर टीका केली.