मुंबई : शिवसेनेच्या नवनिर्वाचित सर्व ५७ आमदारांची आज मुंबईत ताज लँडमध्ये बैठक पार पडली. यावेळी एकनाथ शिंदे यांना गटनेता म्हणून निवडण्यात आले. याशिवाय, जनतेचे आभार मानणारा, मोदी-शहा यांचे अभिनंदन करणारा आणि शिंदे यांचे अभिनंदन करणारा ठरावही मंजूर झाला.