Eknath Shinde: शिंदेंचं टेंशन वाढणार! पक्षातील या दोन नेत्यांमध्ये कोल्ड वॉर? मराठवाड्यात बसणार फटका?

Marathawada Political News: वैजापूरचे विद्यमान आमदार प्रा. रमेश बोरनारे यांच्याकडे वैजापूरसह शहरातील मध्य मतदारसंघाची जबाबदारी असेल.
शिंदेंचं टेंशन वाढणार! पक्षातील या दोन नेत्यांमध्ये कोल्ड वॉर? मराठवाड्यात बसणार फटका?
Eknath Shinde: sakal
Updated on

Maharashtra Political News : राज्यातील होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (शिंदे गट) राज्यातील ११३ विधानसभा मतदारसंघांत निवडणूक प्रभारी आणि विधानसभा निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

इतर मंत्री, आमदारांना आपापले मतदारसंघ दिले असताना, पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात खासदार संदीपान भुमरे यांच्यावर प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चेला उधाण आले.

शिंदेंचं टेंशन वाढणार! पक्षातील या दोन नेत्यांमध्ये कोल्ड वॉर? मराठवाड्यात बसणार फटका?
Eknath Shinde Interview : राज्याचा सर्वांगीण विकास ; हाच ‘महायुती’ सरकारचा ध्यास

छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदावरून भुमरे-शिरसाट यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचे बोलले जाते. भुमरे खासदार झाल्यानंतर पालकमंत्रिपद कुणाकडे जाईल, यावर बरीच चर्चा झाली. परंतु, भुमरे यांनी पालकमंत्रिपदासाठी अब्दुल सत्तार यांच्या नावाची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळाली. तेव्हापासून शिरसाट-भुमरे यांच्यात वाद असल्याचे बोलले जाते.

या पार्श्वभूमीवर शिरसाट यांच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रभारी म्हणून संदीपान भुमरे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आल्यानेही त्यांच्याविरोधातील खेळी तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

जैस्वाल यांच्या मतदारसंघात बोरनारे

पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या स्वाक्षरीने ४६ निवडणूक प्रभारी, तर ९३ विधानसभा निरीक्षक नियुक्त करण्यात आले. यात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे त्यांच्या स्वतःच्या सिल्लोड मतदारसंघासह कन्नडची अतिरिक्त जबाबदारी निवडणूक प्रभारी म्हणून देण्यात आली आहे. खासदार संदीपान भुमरे यांच्याकडे पैठण, छत्रपती संभाजीनगर पश्चिम, जालना आणि बीड विधानसभा मतदारसंघात नेते अर्जुन खोतकर हे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. यासह वैजापूरचे विद्यमान आमदार प्रा. रमेश बोरनारे यांच्याकडे वैजापूरसह शहरातील मध्य मतदारसंघाची जबाबदारी असेल.

शिंदेंचं टेंशन वाढणार! पक्षातील या दोन नेत्यांमध्ये कोल्ड वॉर? मराठवाड्यात बसणार फटका?
Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचं टेंशन वाढणार? ठाण्यातील या ५ जागांवर भाजपने केला दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.