'सकाळ'चे संपादक सम्राट फडणीस (Samrat Phadnis) यांना दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदे यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhansabha Election) प्रचाराचा धुरळा आज (सोमवार) सायंकाळी शांत होणार आहे. येत्या आठवड्याभरात राज्यातील नवे सरकार कोण स्थापणार याचा निर्णय झाला असेल. अशातच "मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही' असे मोठे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले. 'सकाळ माध्यम समूहा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे विधान केले.