ShivSena Candidate List: दिग्गज नेत्यांची वर्णी; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, किती शिलेदार उतरले मैदानात?

Eknath Shinde Shiv Sena Candidate List: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात दिग्गज नेत्यांना संधी दिली आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindesakal
Updated on

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीची जय्यत तयारी सुरू आहे. यासाठी दोन्ही युतीतील पक्ष उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात दिग्गज नेत्यांची वर्णी लागली आहे. या यादीत 20 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत 20 उमेदवारांची नावे आहेत. या यादीत वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात पक्षाने मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेने ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. एकनाथ शिंदे यांचेही नाव पहिल्या यादीत होते. कोपरी-पाचपाकडीमधून मुख्यमंत्री शिंदे निवडणूक लढवत आहेत. 28 ऑक्टोबरला ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

CM Eknath Shinde
MNS Candidates List: मनसेची सहावी यादी जाहीर, ३२ उमेदवारांची नावे, कुणाला मिळाली संधी?

शिंदेंच्या शिवसेनेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर

1.अक्कलकुवा - आमश्या पाडवी

2.बाळापूर- बळीराम शिरसकर

3.रिसोड - भावना गवळी

4.हदगाव- बाबुराव कदम कोहळीकर

5.नांदेड दक्षिण- आनंद तिडके पाटील (बोंडारकर)

6. परभणी - आनंद शेशराव भरोसे

7. पालघर - राजेंद्र घेड्या गावित

8. बोईसर (अज) - विलास सुकुर तरे

9.भिवंडी ग्रामिण (अज) - शांताराम तुकाराम मोरे

10. भिवंडी पूर्व - संतोष मंजय्या शेट्टी

11.कल्याण पश्चिम - विश्वनाथ आत्माराम भोईर

12.अंबरनाथ (अजा) - डॉ बालाजी प्रल्हाद किणीकर

13. विक्रोळी - सुवर्णा सहदेव करंजे

14. दिंडोशी - संजय ब्रिजकिशोरलाल निरुपम

15. अंधेरी पूर्व - मुरजी कांनजी पटेल

16. चेंबूर - तुकाराम रामकृष्ण काते

17. वरळी - मिलींद मुरली देवरा

18. पुरंदर - विजय सोपानराव शिवतारे

19. कुडाळ - निलेश नारायण राणे

20. कोल्हापुर उत्तर - राजेश विनायक क्षिरसागर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही बैठक सुमारे तासभर चालली. या भेटीनंतर आता मुख्यमंत्र्यांनी निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या नेत्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जाणाऱ्या नेत्यांमध्ये मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांचाही समावेश आहे. आमदार गीता जैन यांनी महायुतीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.