मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपांची चुरस आता वाढायला लागली आहे. महाविकास आघाडीकडून वरळीतून शिवसेना नेते आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर मनसेनं देखील त्यांच्याविरोधात संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. पण आता यात आणखी एक चुरशीच्या उमेदवाराची एन्ट्री होणार आहे. वरळीतून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून एका तगड्या तरुण उमेदवाराला संधी देण्याच्या हालचाली सुरु आहेत.