Maharshtra Asssembly Election : राज्यात विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
मला काय मिळालं याचा विचार न करता जनतेला काय मिळालं हे बघणारे आम्ही नेते आहोत. अन्यायाविरूद्ध पेटून उठणं हे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं आहे. शिवसैनिक आणि शिवसेनेचं खच्चीकरण झालं. एकनाथ शिंदेंनी धाडस केलं नसतं तर आज शिवसेना आणि धनुष्यबाणही विकला असता. असा जोरदार हल्ला एकनाथ शिंदेनी केला.