Maharashtra Assembly Election 2024 : ‘काम करणारा मुख्यमंत्री’ हे प्रतिमा संवर्धन यशस्वी

Vidhan Sabha Elections 2024 : शिवसेनेतील अडीच वर्षांपूर्वीची फूट आणि त्यानंतरचे एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री होणे, यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप घडला, जो २०२४च्या निवडणुकांमध्ये महत्त्वाचा ठरतो.
Maharashtra Assembly Elections 2024
Maharashtra Assembly Elections 2024sakal
Updated on

Vidhan Sabha Elections 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणात अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये पडलेली उभी फूट हा राज्याच्या राजकारणातला मोठा भूकंप होता. या प्रकरणाला ३० महिने उलटून गेल्यानंतरही यामुळे निर्माण झालेला राजकीय ताण पुरता निवळलेला नाही. शिवसेनेतून ४० आमदारांना बाहेर घेऊन पडणारे एकनाथ शिंदे यांच्या भोवती त्यानंतरचे राजकारण फिरत आहे. महायुतीने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह शिंदे यांना दिले. सर्व दान बाजूने असतानाही त्यांचे माप काही जड होत नव्हते. शिवसेना ज्या परिस्थितीत मिळवली त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला गेलेला ‘तडा’ प्रतिमा संवर्धनासाठी खूप मोठा अडसर होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.