Nanded Assembly Elections 2024: इच्छुक उमेदवारांची वाढली धाकधूक; राजकीय पक्षांना मतदारसंघ जाहीर न झाल्याने चलबिचल

Nanded North Vidhan Sabha elections 2024 : विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापत आहे. त्यातच नांदेड उत्तरमध्ये डझनावर इच्छुक असून सर्वांचे डोळे आता मुंबईच्या बैठकांकडे लागले आहे.
Nanded North Vidhan Sabha elections 2024
Nanded North Vidhan Sabha elections 2024sakal
Updated on

नांदेड: विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापत आहे. त्यातच नांदेड उत्तरमध्ये डझनावर इच्छुक असून सर्वांचे डोळे आता मुंबईच्या बैठकांकडे लागले आहे. महाविकास आघाडी व महायुतीतील जागा वाटपासंदर्भात काँग्रेस आणि इतर पक्षांच्या नेत्यांत आतापर्यंत चर्चेच्या काही फेऱ्या झाल्या.

परंतु, अद्याप मतदारसंघ जाहीर न झाल्याने त्यांच्यामध्ये इच्छुकांमध्ये धाकधूक कायम आहे. त्यातच मतदारसंघ सोडून घेण्यासाठी स्पर्धा सुरू असल्याचे चित्र आहे.

नांदेड उत्तर मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून कार्याध्यक्ष राजेश पावडे, महेश देशमुख, विठ्ठल पावडे, माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर, डी. पी. सावंत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून या पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर, शिवसेना (उबाठा) माधव पावडे, दत्ता कोकाटे तर भाजपकडून मिलिंद देशमुख इच्छुक आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघाचे माजीमंत्री डी. पी. सावंत यांनी यापूर्वी दोन वेळा प्रतिनिधित्व केले.

त्यानंतर शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. मतदारसंघ सेनेच्या ताब्यात गेला. दरम्यान, शिवसेना पक्ष फुटल्याने या मतदारसंघाचेही चित्र बदलले. ठाकरे गटाने नांदेड (उत्तर) मतदारसंघावर दावा केला आहे. यापूर्वी आम्ही निवडून आणलेला आमदार आहे. त्यामुळे हा मतदारसंघ महाविकास आघाडीतील पक्षांनी सेनेला देण्यात यावा, असा आग्रह स्थानिकांनी पक्षाकडे केली आहे. तर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही मध्यंतरी शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडावा, अशी मागणी केली.

Nanded North Vidhan Sabha elections 2024
सांगोल्यात शेकापला 'हा' उमेदवार देणार कडवी लढत

महाविकास आघाडीत ही स्पर्धा लक्षात घेऊन बालेकिल्ला असतानाही काँग्रेसने पण, वरिष्ठांकडे मागणी केली आहे. तर, महायुतीमध्ये भाजपनेही पक्षाकडे या मतदारसंघाची मागणी केली आहे. त्यामुळे विद्यमान शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची धाकधूक वाढल्याचे च‍ित्र आहे. इच्छुकांच्या घेतल्या मुलाखती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी पुणे येथे पाच ऑक्टोबरला नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघातील पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.

जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांना मानणारा मोठ्या प्रमाणावर मतदार आहे. त्यामुळे जिल्ह्यातून तीन ते चार मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा करून जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, माजी राज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर यांच्यासोबत चर्चा करून जास्तीत जास्त मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडून घ्यावी, अशी चर्चेमध्ये मागणी केली. असे सरचिटणीस प्रा. डी. बी. जांभरुनकर यांनी सांगितले.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.