विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला नोटीस पाठवून २४ तासांच्या आत उत्तर मागवले आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे आयोगाने ही कारवाई केली आहे. खासगी वाहिन्यांच्या काही मालिकांमधून छुप्या प्रचाराचा आरोप शिंदे गटावर करण्यात आला आहे.