Election Commission Press Conference : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला! एका क्लिकवर वाचा सर्व अपडेट

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date: महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी आज दुपारी साडे तीन वाजता निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.
maharashtra vidhansabha election DECLARED live
maharashtra vidhansabha election DECLARED liveesakal
Updated on

Assembly election date LIVE :  लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची आज घोषणा झाली - देवेंद्र फडणवीस

"लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची आज घोषणा झाली. दिवाळीत प्रकाश पर्व असेल! आणि पाठोपाठ दुसरे विकासाचे प्रकाशपर्व आपण 20 नोव्हेंबरला एकत्र साजरे करू! भाजपाच्या नेतृत्वात आपण 2014, 2019 ला भरभरून यश दिले, संपूर्ण बहुमत दिले. चला पुन्हा सारे मिळून सोबत येऊ या, आणि 23 नोव्हेंबरला महायुतीच्या विजयाचा जल्लोष करू या! या लोकउत्सवात आपणही सारे मोठ्या संख्येने सहभागी व्हा! विकासासाठी महाराष्ट्र तुमच्या आशिर्वादाची आणि भक्कम जनादेशाची वाट बघतोय..." - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Lok Sabha Bypoll Election Date Live : विधानसभा निवडणुकीसोबतच होणार लोकसभेची पोटनिवडणूक 

निवडणूक आयोग पत्रकार परिषददेमध्ये पोटनिवडणुकांचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नांदेड लोकसभेसाठी देखील मतदान होणार आहे. वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या पोटनिवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे.

यासोबतच तसेच केरळच्या वायनाड लोकसभा जागेवर देखील पोटनिवडणूक होणार आहे. येथे पोटनिवडणूकीसाठीचे मतदान १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे तर मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होईल. वायनाड येथून राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. पण नंतर त्यांनी खासदारकी जागा सोडून दिल्याने ही जागा रिक्त झाली होती.

Jharkhand Assembly election date LIVE : झारखंडमध्ये दोन टप्प्यात होणार विधानसभा निवडणूक; निवडणूक आयोगाने जाहीर केल्या तारखा

झारखंड विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात घेतली जाणार आहे. १३ आणि २० नोव्हेंबर २०२४ रोजी येथे विधानसभेसाठी मतदान होईल. मतमोजणी ही महाराष्ट्रासोबतच २३ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.

Maharashtra Assembly election date LIVE : ठरलं! महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला होणार मतदान

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान एकाच टप्प्यात होणार असून २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. तर मतमोजणी ही २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यासंबंधीची घोषणा केली आहे. यासोबतच त्यांनी सेलिब्रिटींनी मतदान करण्यासाठी आवाहन करावं, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे असेही सांगितले.

maharashtra vidhansabha election DECLARED live
Maharashtra Vidhansabha Election Declared: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर! आचारसंहिता लागू, मतदान आणि निकालाची तारीख काय?

Maharashtra Assembly election Live :  85 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांना  घरातून मतदानाची सोय : मुख्य निवडणूक आयुक्त

महाराष्ट्रात 1 लाख 186 निवडणूक केंद्र आहेत. ग्रामीण आणि शहरी भागात मतदार केंद्र आहेत, मतदारलाईनमध्ये काही खुर्च्या असतील तशी व्यवस्था सगळ्या मतदान केंद्रवर असेल.. तसेच 85 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मतदाराला घरातून मतदान करण्याचा अधिकार असेल. यासोबतच सगळ्या मतदानाची व्हिडिओग्राफी केली जाईल अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली.

तसेच मुक्त वातावरणात निवडणुका झाल्या पाहिजे अशा सूचना राज्याला आम्ही दिल्या आहेत. सगळ्या पक्षांना समान संधी मिळाली पाहिजे, प्रत्येक चेक पोस्टवर तपासणी केली जाईल. सामान्य नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. 2 किलोमीटरच्या आत मतदान केंद्र असेल असेही त्यांनी सांगितले.

Maharashtra Assembly election date LIVE : विधानसभा निवडणुकीत ९.६३ कोटी नागरिक बजावणार मतदानाचा हक्क

महाराष्ट्रात ३६ जिल्हे आहेत, ज्यामध्ये २८८ विधानसभा मतदारसंघ आहेत. २३४ मतदारसंघ जनरल आहेत तर एसटी २५ आणि एससी २९ मतदारसंघ आहेत. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपत आहे.

मतदार संध्या ९.६३ कोटी ज्यापैकी ४.९७ कोटी पुरूष मतदार तर ४.६६ महिला कोटी मतदार आहेत. १.८५ कोटी तरुणांपैकी २०.९३ हे पहिल्यांदा मदतान करणारे मतदार आहेत. अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे.

Maharashtra Assembly election date LIVE : आज दुपारपासूनच लागू होणार आचारसंहिता; काय असू शकतात तारखा?

केंद्रीय निवडणूक आयोगाने सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्राचा दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये आयोगाच्या सदस्यांनी विविध राजकीय पक्ष, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधून सूचना मागवल्या होत्या. त्याचवेळी निवडणुका जाहीर होतील, असं वाटत असताना आयोगाने केवळ तांत्रिक माहिती देत सणांच्या तारखा टाळून निवडणुका होतील, असं म्हटलं होतं. दरम्यान दिवाळीच्या सुट्ट्यांच्या तारखा वगळून सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम आखण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.विधानसभेच्या २८८ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत होईल.

Maharashtra Assembly election date LIVE : आम्ही निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महायुती निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहे. आमच्या तिन्ही पक्षांचा फॉर्म्युलाही निश्चित आहे. ते दोन-तीन दिवसांत समोर येईल. महायुती जनतेत जाऊ, आम्ही आमचा जाहीरनामा त्यांना देऊ, पीएम मोदींचे सरकार पुढील 5 वर्षे सत्तेत असेल आणि जर महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले तर ते जनतेचे भले करू शकेल आणि महाराष्ट्राला विकासाकडे नेऊ शकेल. जर एकही मत काँग्रेसला गेले तर विकासात अडथळे निर्माण होतील, ते मोदी सरकारच्या सर्व योजना रोखतील.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापण्यासा सुरूवात झाली आहे. यादरम्यान आज केंद्रीय निवडणुक आयोगाची पत्रकार परिषद होणार असून यामध्ये महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यातील विधानसभा निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. महाराष्ट्राच्या विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ हा २६ नोव्हेंबर रोजी तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२५ रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्राची विधानसभा संपुष्टात येण्याआधी नवीन विधानसभा गठीत होणे आवश्यक आहे. त्यामुळे त्या आधीच निवडणुका पार पडणे अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.