शिर्डी : विधानसभा निवडणुकीला सामोरे जातान विरोधातील उमेदवार आपणच ठरवायचा. नूरा कुस्ती करायची आणि जनतेच्या पाठबळावर विक्रमी मतांनी निवडणूक जिंकल्याची हाकाटी पिटायची. हा फंडा शुगर लॉबीतले बलाढ्य नेते शक्य होईल त्यावेळी हमखास वापरतात. त्यामुळे प्रतिस्पर्ध्याच्या मतदारसंघातील उमेदवार निवडताना तो तडजोड करून घरी बसणार नाही किंवा ऐनवेळी माघार घेऊन निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही, हे दोन सर्वाधिक महत्त्वाचे मुद्दे डोळ्यांसमोर असतात.