EVM Machine Down: महाराष्ट्रात आज २८८ मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून, राज्यभरातील अनेक ठिकाणी EVM मशीनमध्ये बिघाड होण्याची समस्या उभी राहिली आहे. या बिघाडामुळे नागरिकांची मतदान प्रक्रियेतील अडचण वाढली असून, पुणे जिल्ह्यातील कोथरुड परिसरात एका युवतीने आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.