Maharashtra Vidhan Sabha Election: मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर आता निकालाचा कल स्पष्ट होत आहे. मात्र मतदार, उमेदवार आणि कार्यकर्त्यांचं लक्ष लागून असलेले एक्झिट पोल्स आणि प्रत्यक्ष निकाल यांच्यात किती अंतर आहे, किती साम्य आहे?.महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी या राज्यपातळीवरील दोन तगड्या पक्षांत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होत होत्या. त्यामुळे या फूटीचा फायदा भाजप महायुतीला होणार का असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. .Aaditya Thackeray Maharashtra Assembly Election: मनसेचं 'इंजिन' रोखू शकला नाही आदित्य यांचा विजयीरथ; आव्हानातही ठाकरेंना जिंकवणारी कारणं.महाराष्ट्र विधानसभा एक्झिट पोल्सचं काय म्हणणं होतं?मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच एक्झिट पोल्स जाहीर झाले होते.मॅटराइज सर्व्हेनुसार भाजप आणि मित्रपक्षांना 150-170 जागा तर काँग्रेस आणि मित्रपक्ष ( मविआ) ला 110-130 जागा मिळतील असा अंदाज होता. बाकीचे पक्ष मिळून 8-10 जागांची अटकळ होती. तर पीपल्स पल्सने महायुतीला 182 तर महाविकास आघाडीला 97 जागा सांगितल्या होत्या. चाणक्य स्ट्रॅटेजीजने महायुतीला 152 ते 160 तर महाविकास आघाडीला 130-138 इतक्या जागा दिल्या होत्या. .Paschim Maharashtra Assembly Election 2024 Results : पश्चिम महाराष्ट्रात 'महायुती'ची जोरदार मुसंडी; कोणत्या मतदारसंघांत कोण आहे आघाडीवर?.दुसरीकडे पी- मार्कच्या मते, महायुतीला 137-157 इतक्या जागा आणि मविआ ला 126 ते 146जागांचा अंदाज होता.तर दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 125 ते 140 जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला 135 ते 150 जागांवर विजय मिळेल, अशी अटकळ बांधण्यात आली होती.तर पोल डायरीच्या अंदाजानुसार महायुतीला 122 ते 186 आणि महाविकास आघाडीला 69 ते 121 जागांवर विजय मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता..जवळपास सगळ्याच एक्झिट पोल्सनी महायुतीला विजय मिळेल, असंच सांगितलं होतं. महाविकास आघाडीची कितीही हवा असली तरी महायुतीच जिंकेल, असं भाकीत केलं होतं. ते खरं होताना दिसत आहे. मात्र महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात काटेंकी टक्कर होईल असा जो अंदाज वर्तवण्यात आला होता तो मात्र सपशेल खोटा ठरताना दिसत आहे. .Arvind Jagtap Letter: पूर्वी लोकांच्या आचरणात राम होता.. आता राजकारणात उरलाय.! .आताच्या निकालानुसार भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महायुतीने विरोधकांचा धुव्वा उडवल्याचं चित्र आहे. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.