उल्हासनगर - साफसफाईच्या कामांसाठी कंत्राटदार नेमण्यात येत असून त्यामुळे वर्षोनुवर्षे महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण करण्याचे काम महायुती सरकारच्या काळात सुरू झाले आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील 10 लाख सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंह टाक यांनी दिली.