Heena Gavit : भाजपला विधानसभेच्या तोंडावर मोठा झटका! माजी खासदाराचा पक्षाला रामराम; विधानसभेच्या मैदानात अपक्ष लढणार

Maharashtra Assembly Election 2024 Latest News : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असतानाच दुसरीकडे भाजपला मोठा धक्का बसला आहे.
Dr. Heena Gavit
Dr. Heena Gavitesakal
Updated on

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असतानाच दुसरीकडे भाजपला मोठा धक्का बसला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. आज त्यांनी आपल्या भाजप सदस्य पदाचा राजीनामा दिला असून यासाठी त्यांनी महायुतीमधील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जबाबदार ठरवलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.