Latest Maharasthra News: केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘एक देश, एक निवडणूक’ या बद्दलचा निर्णय आज घेतला असला तरी महाराष्ट्रात लवकरच होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारली जात आहे.
राजकीय गोंधळापासून सावरण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी विसर्जित होणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेला मुदतवाढ देणे किंवा हा निर्णय प्रत्यक्षात येईपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करणे या पर्यायाचा विचार केला जाणार नाही, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.