फुलंब्री : फुलंब्री विधानसभा मतदारसंघात सध्या निवडणुकीचे वारे वाहत असताना शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख राजेंद्र ठोंबरे व भाजप ओबीसीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळे यांच्यासह काँग्रेसचे पंडित पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना (उबाठा) पक्षात बुधवारी प्रवेश केला. त्यामुळे निवडणुकीच्या काळातच महायुतीला धक्का बसला आहे.