फुलंब्री : फुलंब्री विधानसभा मागील तीन टर्मपासून देवगिरी सहकारी साखर कारखान्यावरच होत आहेत. या कारखान्याला सुरू करण्याचे सगळ्यांकडूनच आश्वासन दिले जाते. मात्र, प्रत्यक्षात या कारखान्याची चाके अजूनही हललीच नाहीत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही कारखाना सुरू करण्यावरच आरोप-प्रत्यारोप शिगेला पोचला आहे. त्यामुळे यंदाही फुलंब्री विधानसभा निवडणुकीचा प्रचार देवगिरी कारखान्याभोवतीच फिरत असल्याचे दिसून येत आहे.