स्व-पक्षासहित विरोधी पक्षात खरं आणि बरं बोलणारे, आपापल्या पक्षाची विचारधारा पुढे घेऊन जाण्यासाठी राज्याचे, देशाचे भविष्य घडविणारे ‘गड’करी तयार व्हायला हवेत. भाषण ही कला आहे आणि भाषणासाठी अभ्यास, वाचन, निरीक्षण, हजरजबाबीपणा आवश्यक असतो. उत्तम वक्त्याला श्रोते नेहमीच डोक्यावर घेतात हे विसरून चालणार नाही.