महाराष्ट्रात महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु शपथविधीबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्याशिवाय दोन उपमुख्यमंत्रीही शपथ घेऊ शकतात. राजभवनात हा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे या सगळ्या रणनितीसाठी महायुतीतील पक्षांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. भाजपच्या नेत्यांचीही आज बैठक पार पडली आहे. यानंतर काही नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यांनी मविआवर पुन्हा टीका केली आहे.