महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुती आघाडीने प्रचंड बहुमताने सत्तेत पुनरागमन केले आहे. काही महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणुका झाल्या, त्यात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीला मोठा धक्का बसला. महाविकास आघाडीला अनपेक्षित यश मिळाले. यानंतर शरद पवारांना महाराष्ट्राचे चाणक्य म्हटले जाऊ लागले.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. शरद पवार यांच्या पक्षाला केवळ १० जागा मिळवता आल्या. आता प्रश्न पडतो की लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या ६ महिन्यांत असे काय घडले की भाजप मजबूत झाला आणि MVA दयनीय स्थितीला पोहोचला? महाराष्ट्र विधानसभेचे सुरूवातीपासूनचे निकाल काढले तर यात या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल. जेव्हा भाजप विधानसभेत पहिल्यांदा लढला होता. तेव्हा भाजपच्या ० जागा आल्या होत्या. नंतर हा आलेख वाढत गेला.