पूर्वीच्या काळी भास्कर जाधव शिवसेनेत असताना रमेश कदम काँग्रेसनंतर (Congress) राष्ट्रवादीत होते. त्या वेळी दोघांमधील टोकाचे राजकीय वैर होते.
चिपळूण : गुहागर विधानसभा मतदारसंघाचे (Guhagar Assembly Constituency) आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) १८ वर्षांनंतर प्रथमच एका राजकीय व्यासपीठावर एकत्र आले. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारासाठी दोघांनी देवरूख, संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यात एकत्र सभा घेतल्या. त्यामुळे या दोघांमधील ४० वर्षांपासून असलेले राजकीय वैर आणि १८ वर्षांपासूनचे राजकीय अंतर संपल्याचे पाहायला मिळाले.