Chandgad Assembly Seat : 'अजित पवार भाजपला योग्य दखल घ्यायला लावतील'; असं का म्हणाले हसन मुश्रीफ?

Chandgad Assembly Constituency : उपमुख्यमंत्री पवार यांनी राजेश पाटील (Rajesh Patil) यांचे नाव जाहीर केल्यानंतर भाजपमध्ये अस्वस्थता पसरली होती.
Chandgad Assembly Constituency
Chandgad Assembly Constituencyesakal
Updated on
Summary

''राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी नाव जाहीर केले आहे. मात्र, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रविवारी भाजपचे शिवाजीराव पाटील यांचे नाव जाहीर केले. ही बाब बरोबर नाही.''

कोल्हापूर : ‘चंदगड विधानसभा मतदारसंघात (Chandgad Assembly Constituency) विद्यमान आमदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्क आहे. त्याप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार राजेश पाटील यांचे नाव जाहीर केले आहे. तरीही गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाजपच्या शिवाजीराव पाटील यांचे नाव जाहीर केले. हे बरोबर नाही. याबाबत अजित पवार (Ajit Pawar) भाजपला योग्य दखल घ्यायला लावतील’, असे वक्तव्य पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले.

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामाचा प्रारंभ केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी राजेश पाटील (Rajesh Patil) यांचे नाव जाहीर केल्यानंतर भाजपमध्ये अस्वस्थता पसरली होती. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाजपच्या शिवाजीराव पाटील यांचे नाव जाहीर केले. #ElectionWithSakal

Chandgad Assembly Constituency
Dhananjay Mahadik : 'काँग्रेसच्या काळात साधा चमचाही मिळाला नाही'; असं का म्हणाले भाजप खासदार महाडिक?

चंदगडमध्ये उमेदवारीवरून तापलेल्या या वातावरणाबाबत विचारले असता पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘मी आज मुंबईला जाणार आहे. घटना समजून घेईन. महायुतीप्रमाणे जागा विद्यमान आमदारांची असेल तर ती राष्ट्रवादी पक्षाची आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी नाव जाहीर केले आहे. मात्र, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रविवारी भाजपचे शिवाजीराव पाटील यांचे नाव जाहीर केले. ही बाब बरोबर नाही. अजित पवार भाजपला त्याची योग्य दखल घ्यायला लावतील.’

Chandgad Assembly Constituency
Raju Shetti : 'महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व जागा स्वतंत्रपणे लढविणार'; बेळगावात राजू शेट्टींची मोठी घोषणा

मुश्रीफ म्हणाले, ‘बाबा सिद्दीकी यांची हत्या ही दुर्दैवी घटना आहे. प्राथमिक तपासात काही संघटनांची नावे समोर आली आहेत. पोलिस हत्येचे नेमके कारण शोधत आहेत. टीका करणे हे विरोधकांचे काम आहे; पण अशा स्थितीत हत्येच्या गोष्टीचेही राजकारण करतात हे चुकीचे आहे. सिद्दीकी यांच्याभोवती सुरक्षा होती. मात्र, ते २४ तास लक्ष ठेवू शकत नाहीत. त्यांची नजर चुकवून घटना घडल्याची शक्यता आहे. एका संघटनेचे सलमान खानसोबत वाद समोर आले आहेत. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सलमानशी संबंधित लोकांची सुरक्षा व्यवस्था वाढवली पाहिजे, सुरक्षा दिली पाहिजे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.