Hingana Assembly Election Results 2024: हिंगणा मतदारसंघात समीर मेघे ७८९३१ मतांनी विजयी
Hingana Assembly Election Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूका २० नोव्हेंबरला पार पडल्या असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर झाला आहे. या निवडणूकीने संपूर्ण राज्याचे वातावरण बदलून टाकले आहे. महाराष्ट्राच्या ४८ व्या विधानसभा क्षेत्र हिंगणा विधानसभा क्षेत्रावर खास लक्ष होते.
हिंगणा विधानसभा हा मतदारसंघ 2008 च्या पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आला. या मतदारसंघात भाजपाचे वर्चस्व कायम आहे. हिंगणा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर, 2009 च्या निवडणुकीपासून ते आतापर्यंत येथे भाजपाचाच दबदबा दिसून आला आहे. 2009 मध्ये विजयबाबू घोडमारे यांनी भाजपाच्या तिकीटावर विजय मिळवला होता, त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये समीर मेघे यांनी परत निवडून येण्याचा पराक्रम केला. सद्यस्थितीत समीर मेघे हे हिंगणा विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार आहेत. यंदा रमेश बंग (राष्ट्रवादी-एसपी) समीर मेघे (भाजप) यांच्यात चुरशीचा लढत पाहायला मिळाली.