Thane politics: ठाणे जिल्ह्यातील २०२ मतदारांनी केले गृहमतदान; ८५ वर्षांवरील १६६ ज्येष्ठ नागरिक,तर ३६ दिव्यांग मतदारांचा समावेश

Vidhan Sabha Elections 2024: ठाणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे, त्यात दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवारी पहिल्या दिवशी २०२ मतदारांनी हा हक्क बजावला
Thane politics :
Thane politics :sakal
Updated on

ठाणे: जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत अंथरुणाला खिळलेले, दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना मतदानासाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार शनिवारी पहिल्याच दिवशी २०२ मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ८५ वर्षांवरील १६६ ज्येष्ठ नागरिक, तर ३६ दिव्यांग मतदारांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.