शेतकऱ्यांना गाडीभर लुटून अनुदानापोटी चिमूटभर भीक दिली जात आहे. शेतकरी आत्महत्यांवर चर्चाच होत नाही, असे चित्र आहे.
सांगली : लोकसभेची निवडणूक सहा महिन्यांपूर्वी झाली, तर विधानसभा निवडणूक (Sangli Assembly Election) अवघ्या १३ दिवसांवर आहे. यानिमित्ताने सध्या राज्यातील सत्ताधारी महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. देशातील ५९ टक्के ग्रामीण कुटुंबांचा व्यवसाय शेती आहे. त्या शेतीचे भवितव्य आणि भविष्यातील शेतीवर आता बोलण्याची वेळ आली आहे. महायुतीने शेतीपंपाची वीज बिले माफ केली आणि महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना (Farmers) तीन लाखांपर्यंतची कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे.