येत्या महिन्याभरात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. यापार्श्वभूमीवर मविआचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कसा ठरवला जाईल? याचे निकष काय असतील? याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्न विचारण्यात आला की, शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मविआनं मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा. यावर चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निश्चित करणं हे माझ्या हातात नाही, हे माझ्या दिल्लीतील हायकमांडच्या हातात आहे. काँग्रेसचं नेतृत्व दिल्लीत आहे, त्यानुसार राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेते कोणता उमेदवार निश्चित करायचा किंवा नाही हे ठरवतील.
यंदा काँग्रेस निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करु शकतं. दुसरीकडं विरोधकही विधानसभा निवडणुकीला सामोरं जात आहेत पण त्यांनी अद्याप मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. पण ज्या पक्षाचे जास्त उमेदवार त्यांचा मुख्यमंत्री अशी आजवरची परंपरा राहिलेली आहे. शिवसेनेला देखील २०१९मध्ये याच तत्वावर मुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं.
लोकसभा निवडणुकीत आमचा अंदाज खरा ठरला होता. आम्ही ४८ पैकी ३२ जागा मविआला मिळतील असा अंदाज वर्तवला होता त्यांपैकी ३१ जागा आम्ही जिंकल्या. यापैकी एक एकच जागा जी साताऱ्याची होती तीच आम्ही गमावली. याच धर्तीवर आता विधानसभा निवडणुकीत देखील रणनीती आखली जाईल, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.