इचलकरंजी : आता आम्ही भाजपवासिय झालो आहोत. नेते नव्हे तर कार्यकर्ते आहोत. कार्यकर्त्यांना यापुढे बळ देण्याची आमची जबाबदारी असणार आहे. बोट दाखवाल त्या कार्यकर्त्याला महापालिका निवडणुकीत संधी दिली जाईल. त्यामुळे महापालिकेत (Ichalkaranji Municipality) भाजपचाच महापौर (BJP Mayor) असणार आहे. पण, या पदावर आवाडे घराण्यातील कोणीही असणार नाही, अशी घोषणा आमदार प्रकाश आवाडे (MLA Prakash Awade) यांनी येथे केली.