Imtiaz Jaleel यांचं ठरलं! नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढवणार, भावी खासदार उल्लेख; कार्यकर्त्यांकडून पोस्ट व्हायरल

Nanded Lok Sabha By Election: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीबाबत इम्तियाज जलील यांचं ठरलं आहे. भावी खासदार उल्लेख करत कार्यकर्त्यांनी एक पोस्ट व्हायरल केली आहे.
Imtiaz Jaleel over investigate kolhapur incident in gajapur activist strike
Imtiaz Jaleel over investigate kolhapur incident in gajapur activist strikeSakal
Updated on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासोबतच लोकसभेच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूकही जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड लोकसभेच्या जागेसाठी 20 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वसंत चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर आता दुसरीकडे नांदेड लोकसभा पोटनिडणुकीसाठी एमआयएमचे इम्तियाज जलील मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत.

एमआयएमकडून इम्तियाज जलील नांदेडमधून लोकसभा पोटनिवडणूक लढणार असल्याच्या जोरदार चर्चा आता सुरू झाल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर सोशल मीडियावर एमआयएम कार्यकर्त्यांकडून पोस्ट व्हायरल झाली आहे. सोशल मीडियावर नांदेडचे भावी खासदार म्हणून उल्लेख करत ही पोस्ट व्हायरल केली जात आहे. याआधी नुकतीच इम्तियाज जलील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. दरम्यान याबाबत विचारले असता इम्तियाज जलील यांनी नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढवणार असल्याचा बातमीला दुजोरा दिला आहे. त्यांनी साम टिव्हीला याची माहिती दिली आहे.

Imtiaz Jaleel over investigate kolhapur incident in gajapur activist strike
Nanded Lok Sabha by Election: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला! 'या' बड्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब

खासदार झालेल्या वसंत चव्हाण यांचे 26 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यामुळे नांदेड लोकसभा जागा रिक्त झाली. त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर नांदेड लोकसभा पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यानुसार 20 नोव्हेंबर रोजी नांदेडमध्ये विधानसभा आणि लोकसभेसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकांचे निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. नांदेडसोबतच मेघालयच्या जांब्रज एसटी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनेही उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. जिंगजांग एम मारक हे तिथले उमेदवार आहेत.

बुधवारी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. या बैठकीत नाना पटोले यांनी रवींद्र चव्हाण यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. आता काँग्रेसने प्रदेश काँग्रेसचा प्रस्ताव मंजूर करून नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 62 जागांसाठी उमेदवारांना मान्यता देण्यात आल्याचे नाना पटोले यांनी बैठकीनंतर जाहीर केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.