मुंबई : राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी २५ मतदारसंघ हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. या ठिकाणांहून अनेक दिग्गज आपले नशीब आजमावत आहेत. अहेरी मतदार संघात तर पहिल्यांदाच वडील विरुद्ध मुलगी अशी निवडणूक होत आहे. मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी दंड थोपटले आहेत.