नांदेड: लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये मुद्रित व अन्य सर्व माध्यमांमध्ये सर्व उमेदवारांना प्रसिद्धीचा समतोल न्याय मिळावा, अशी अपेक्षा काही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी मंगळवारी (ता.५) झालेल्या बैठकीमध्ये व्यक्त केल्या. या संदर्भात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित राऊत यांनी माध्यमांना सर्व उमेदवारांना समतोल न्याय देण्याचे आवाहन केले.